0
बुलडाणा  - विदर्भ आणि मुंबईला जोडणार्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी संपादीत करावयाच्या सात हजार २९० हेक्टर जमिनीपैकी सहा
हजार ५७ हेक्टर जमिनीचे २८ जून पर्यंत संपादन झाले आहे. सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमीन खरेदी करून बुलडाणा जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात आता अवघे १३६ हेक्टर क्षेत्र संपादीत करावयाचे राहले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग थेट मुंबईला समृद्धी महामार्गाद्वारे जोडण्यात येणार आहे. हा मार्ग पुर्णत्वास गेल्यावर नागपूर-मुंबईचे अंतर कमी होऊन शेतकर्यांना थेट मुंबईमध्ये माल पोहोचवण्यासोबतच बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, जालना, ठाणे, अहमदनगरसह
बहुतांश जिल्ह्यांच्या विकासाला तथा औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
त्यामुळे या प्रकल्पावर मोठा जोर दिल्या गेला आहे.
जमीन संपादनाची टक्केवारी पाहता वाशिम जिल्हा राज्यात अव्वल असून ९२ टक्के जमीन या जिल्ह्यात संपादीत झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८८ टक्के, नाशिक जिल्ह्यात ७७ टक्के, अमरावती जिल्ह्यात ९० टक्के, वर्धाजिल्ह्यात ८७ टक्के, ठाणे जिल्ह्यात ७४ टक्के, जालना ७७ टक्के, अहमदनगर ८५ टक्के आणि नागपूर जिल्ह्यातील ९३ टक्के जमीन समृद्धीसाठी संपादीत केली गेली आहे.
बुलडाण्यात सर्वाधिक खरेदी
एकट्या बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ८०६ खरेदया या सरळ खरेदीद्वारे झाल्या आहेत. त्यानंतर औरंगाबादमध्ये एक हजार ७५१ जणांच्या खरेदया झाल्या असून नाशिक जिल्ह्यामध्ये एक हजार ५८३जणांच्या जमिनीच्या सरळ खरेदी झाल्या आहेत. दहाही जिल्ह्यात आजपर्यंत १० हजार ५३० जणांची जमीन थेट खरेदीदर संपादीत करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गासाठी सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमिनीचे बुलडाणा जिल्ह्यात भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात बुलडाणा जिल्हा
अग्रस्थानी स्थानी आहे.
- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
Buldhana top in state in the land is purchased by buying directly for 'Samrudhi Highway' | ‘समृद्धी’साठी सरळ खरेदीने जमीन घेण्यात बुलडाणा राज्यात अव्वल

Post a Comment

 
Top