मुंबई :संजय दत्तचा बायोपिक 'संजू' शुक्रवारी रिलीज होतोय. परंतू तुम्हाला माहिती आहे का, यामध्ये स्वतः संजय दत्तची झलक पाहायला मिळतेय. चित्रपटाची एक इमेज मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहे. यामध्ये संजू रणबीरसोबत डान्स करताना दिसतोय. बॅकग्राउंडमध्ये काही मुली आणि भिंतीवर वर्तमानपत्र दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार राजकुमार हिरानी यांनी हे ऑफिशिअली रिलीज केले नाही. परंतू हे लीक झाले आहे.
हा फोटो प्रमोशनल गाण्यातील आहे
- राजकुमार हिरानी आणि त्यांच्या टीमने चित्रपटासाठी एक प्रमोशनल गाणे तयार करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू आता मानले जातेय की, हे गाणे चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात येईल. हा व्हायरल झालेला फोटो त्यांच गाण्यातील आहे असे मानले जातेय. थीमनुसार, पहिले रणबीर संजयला त्याच्या आयुष्याविषयी काही प्रश्न विचारताना दिसेल आणि नंतर दोघंही गाण्यावर डान्स करताना दिसतील.
संजय दत्तच्या आयुष्यातील दोन काळांवर चित्रपट
चित्रपटाचे डायरेक्टर राजकुमार हिरानीने मुलाखतीत स्वतः स्पष्ट केले की, संजय दत्तच्या आयुष्यातील दोन भाग या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये एक भाग म्हणजे तो ड्रग अॅडिक्ट होतो आणि दूस-या भागात त्याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन दाखवण्यात येईल. चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, मनीषा कोइराला, सोनम कपूर, दीया मिर्जा, विक्की कौशल आणि जिम सर्भही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Post a Comment