0
जळगाव : घराच्या गच्चीवर खाली येत असताना जिन्यावरुन पडल्याने योगेश दिनकर पाटील (वय २६, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता घडली. योगेश हा दारुच्या नशेत असल्यानेच तोल जाऊन जिन्यावरुन पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
योगेश हा वडील दिनकर पाटील यांच्यासोबत प्लंबीगचे काम करायचा, मात्र तो दारुच्या आहारी गेलेला होता. मंगळवारी सायंकाळी दारु पिऊनच तो घरी आला. रात्री नऊ वाजेच्या सुमारास आई दुर्गाबाई यांनी त्याच्यासाठी जेवण वाढले आणि त्या बाहेर आल्या.
वडील साडे नऊ वाजता घरी आले तेव्हा काही तरी पडल्याचा आवाज झाला. त्यांनी जिन्याकडे जाऊन पाहिले तर योगेश खाली पडला होता व त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु होता.
योगेश हा मृत झाल्याची खात्री पटल्याने रहिवाशांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव, सहायक फौजदार अतुल वंजारी व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
दुपारी आईशी वाद
योगेश हा अविवाहित होता. दारुच्या आहारी गेल्याने पैशासाठी त्याने दुपारी आईशी वाद घातला होता. दरम्यान, मोठा भाऊ संदीप हा अयोध्या नगरात राहतो. तर दोन्ही बहिणी विवाहित आहेत. दरम्यान, भूषण सोनवणे व गणेश सोनवणे यांनी रुग्णवाहिकेतून योगेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

Junk falls in Jalgaon | जळगावात जिन्यावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

Post a Comment

 
Top