0
आता या तुकडीचे मुख्यालय दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्या सीमेजवळ नेण्यात य़ेणार आहे.  जपानशी लढण्यासाठी अमेरिका 1945मध्ये सेऊलमध्ये सैन्य आणले होते. त्यानंतर सलग सात दशके ते येथएच ठेवण्यात आले. महायुद्धानंतर उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने हे सैन्य तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला.
या सैन्यामुळे अनेक दक्षिण कोरियन लोकांमध्ये अमेरिकेविरोधात भावनाही निर्माण झाली होती. 2008 साली या सैन्याची जागा बदलण्यात येणार होती मात्र अनेकवेळा ते पुढे ढकलण्यात आले. अखेर आता त्याची जागा बदलण्यात येत आहे.

US ends 70 years of military presence in South Korean capital | 70 वर्षांनी दक्षिण कोरियाच्या राजधानीतून अमेरिकन सैन्य बाहेर

Post a Comment

 
Top