0
अभिनेत्री क्रिती सॅननची लहान बहीण नूपुर सॅनन लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. त्याकरिता ती स्पेशल ट्रेनिंग घेत असल्याचेही समजते. नुकताच तिचा एक म्युझिक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. परंतु गायक नाही तर अभिनेत्री बनण्याची इच्छा आहे. तिच्याशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, ‘नूपुरमध्ये अभिनयासाठी खूप पॅशन आहे. सिंगिंग हा तिचा केवळ छंद आहे. त्यामुळे जर तिला गाण्याची संधी मिळाली तर ते तिच्यासाठी बोनस असेल.’ 

नूपुर सध्या मुकेश छाबडा, प्रशांत सिंग आणि अभिषेक पांडेच्या अ‍ॅक्टिंग वर्कशॉपमध्ये जात असते. सूत्रानुसार, ती प्रत्येक आउटसायडरप्रमाणे मेहनत करीत आहे. तिने पॉँडेचरी येथे आदिशक्तीमध्ये अ‍ॅक्टिंगचा कोर्सही केला आहे. त्याचबरोबर स्वत:ला स्लिम ठेवण्यासाठी ती दररोज जीम आणि डान्स क्लासही जात असते. मध्यंतरी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, ती टीव्ही अभिनेता जान खान याला डेट करीत आहे. जान ‘झल्ली अंजली’मध्ये बघावयास मिळाला आहे. वास्तविक या बातमीला कुठलाही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. 

Post a Comment

 
Top