0
औरंगाबाद-मोतीकारंजा, गांधीनगर, शहागंज, आणि चिकलठाणा भागात शुक्रवारी रात्री दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. यानंतर काही भागांमध्ये वाहने आणि दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांच्या तुकडीवर जमावाने तुफान दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दगडफेकीत एकाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. त्यात पोलिस कर्मचार्‍याचा समावेश आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले आणि पोलिस प्रशासनाने केले आहे. तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री एका दुकानासमोर उभ्या असलेल्या दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या घटनेचे रूपांतर जाळपोळीत झाले. नंतर इतर भागांत देखील याचे लोण पसरले अशी माहिती पोलिसांनी दिली. परंतु आता तणाव पूर्णपणे निवळला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे, आवाहन शहरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी केले आहे.

या वेळी नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्यासह काही कर्मचारी जखमी झाले. दोन दिवसांपासून गांधीनगर आणि मोतीकारंजा परिसरात अवैध नळ कनेक्शन आणि पाणीपट्टी थकीत असलेल्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. असे जवळपास १०० कनेक्शन तोडण्यात आले आहेत. याविरुद्ध नागरिक रस्त्यावर उतरले तेव्हा शहर पोलिसांचे राखीव दल आणि विविध पोलिस ठाण्यांच्या पेट्रोलिंग व्हॅन घटनास्थळी पोहचल्या. तरीही रात्री उशिरापर्यंत जमाव आक्रमक होता. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, ज्ञानोबा मुंढे, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, हेमंत कदम यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे कळ
ते आहे

Post a Comment

 
Top