0

धडाकेबाज पोलीस अधिकारी, महाराष्टÑ दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख, राज्याचे अप्पर महासंचालक हिमांशू रॉय (५५) यांनी शुक्रवारी दुपारी दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरी तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली.


मुंबई : धडाकेबाज पोलीस अधिकारी, महाराष्टÑ दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख, राज्याचे अप्पर महासंचालक हिमांशू रॉय (५५) यांनी शुक्रवारी दुपारी दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरी तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. तीन दशके महाराष्टÑ पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावणाऱ्या अधिकाºयाने स्वत:चे जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कर्तबगार पोलीस अधिकारी गमावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
हिमांशू रॉय यांना काही काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. कर्करोगाचे निदान व नंतर उपचार सुरू झाल्यावरही ते कामावर येत होते. मात्र आजार बळावल्यानंतर ते दोन वर्षांपासून रजेवर होते. हाडाच्या कर्करोगाला कंटाळून जीवन संपवित आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. आजार बळावल्याने त्यांची
प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना उपचारासाठी परदेशातही जावे लागत होते.
गोकूळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री त्यांच्यावर चंदनवाडी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक आजी-माजी वरिष्ठ अधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

घटनाक्रम
दुपारी १२.४० वाजता - गोळी झाडून राहत्या घरी आत्महत्या
दुपारी १.४५ - बॉम्बे रुग्णालयात मृत घोषित
दुपारी ३.४५ - शवविच्छेदनासाठी मृतदेह जीटी रुग्णालयात
सायंकाळी ७.३० - मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात
रात्री १०.१५ - चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले...
हाडाच्या कर्करोगाला कंटाळून जीवन संपवित
आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये.नरिमन पॉइंट येथील सुनीती या शासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रॉय हे पत्नी भावना यांच्यासोबत राहत होते. दुपारी १च्या सुमारास त्यांनी बेडरूममध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून तोंडात गोळी झाडून घेतली.रक्तबंबाळ अवस्थेत पत्नी आणि
त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या
दोघा कर्मचाºयांनी त्यांना बॉम्बे
रुग्णालयात दाखल केले. मात्र
डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

Post a Comment

 
Top