0
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जेटली सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणासाठी उभे राहतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोदी सरकार काय देणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

Union Budget 2018-19 LIVE UPDATE


10.39. AM : अर्थसंकल्प 2018 ला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

10.35 AM: पहिल्यांदाच बजेटचं भाषण हिंदीत होणार, अर्थमंत्री अरुण जेटली संपूर्ण बजेट हिंदीत मांडणार

10.23 AM : बजेटपूर्वी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया -  स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प

10:15 AM: बजेटपूर्वी कॅबिनेट बैठक सुरु, अरुण जेटलींकडे सर्वांचं लक्ष

10.10 AM : बजेटनंतर अर्थमंत्री अरुण जेटली दुपारी 4 वा पत्रकार परिषद घेणार
10.03 AM : अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत दाखल

09.54 AM : अर्थसंकल्पाचे दस्तऐवज संसदेत दाखल08:56 AM: अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला, सकाळी 11 वा जेटली बजेट सादर करणार

08.40 AM: अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्लांची एबीपी न्यूजला प्रतिक्रिया, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?
या अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी असलेल्या योजनांना जास्त निधीची तरतूद केली जाऊ शकते. मनरेगा, ग्रामीण आवास, सिंचन योजना आणि पीक विमा यांसारख्या योजनांसाठीचा निधी वाढवला जाऊ शकतो. ग्रामीण मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली असल्याचं नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रासाठी चांगल्या तरतुदी असण्याची अपेक्षा आहे.

करात सूट मिळणार?
जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांना ज्या अडचणी आल्या, त्या दूर करण्यासाठी जेटली काही घोषणा करु शकतात. सोबतच प्राप्तीकरातील सुटीची मर्यादा वाढवून सर्वसामान्यांना दिलासा दिला जाऊ शकतो. महसुलासोबतच रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी निधी दिला जाईल. यासोबतच आर्थिक संतुलन साधण्याचंही जेटलींसमोर आव्हान असेल.

सध्याचा टॅक्स स्लॅब

उत्पन्न            –          टॅक्स रेट

0 ते अडीच लाख     –    शून्य

2.5 लाख ते पाच लाख –  10 टक्के ( तीन हजारांची अतिरिक्त सूट )

5 लाख  ते दहा लाख –    20 टक्के

दहा लाखांपेक्षा जास्त –    30 टक्के

Budget 2018 Live: पहिल्यांदाच बजेटचं भाषण हिंदीत

Post a Comment

 
Top