0
नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीचे निकाल हे ट्रेलर होते. राजस्थान पोटनिवडणुकीचे निकाल हा इंटरव्हल आहे. 2019 साली खरा पिक्चर बघायला मिळेल अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 2019 साली शिवसेना कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट करताना एकदा सुटलेला बाण परत कधीच येत असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीचे निकाल गुरूवारी आले. बंगालमधील एका लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल आला. यात भाजपचा दारूण पराभव झाला. राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार कमबॅक केले तर बंगालमध्ये ममतांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. 2013 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 200 पैकी तब्बल 161 जागा जिंकल्याा होत्या तर लोकसभेच्या सर्वच्या सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता चार वर्षानंतर राजस्थानमध्ये भाजपला घरघर लागल्याचे दिसत आहे. मोदी-शहांच्या भाजपने काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली असली तरी काँग्रेस कमबॅक करू लागली आहे. नेमकी हीच संधी साधून भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला चिमटा काढला आहे.
संजय राऊत म्हणाले, गुजरात निवडणुकीने 2019 साली काय होईल याचा ट्रेलर दाखवला होता. आता राजस्थान पोटनिवडणुकीद्वारे इंटरव्हल झाल्याचे दिसते पण खरा चित्रपट 2019 साली सर्वांनाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच शिवसेनेने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसोबत युती करणार का असा सवाल केला असता की, संजय राऊत यांनी भाजपशी युती कोणत्याही स्थितीत होणार नसल्याचे सांगितले. एकदा सुटलेला बाण परत कधीच येत नाही असे सांगत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा पुर्नच्चार केला.
अर्थमंत्री अरूण जेटलींनी सादर केलेले बजेट छान आहे पण ते कागदावरच आकर्षक दिसतेय. प्रत्यक्ष कृती काय होते ते पाहावे लागेल. शेतकरी आत्महत्या करतच आहेत. त्यामुळे यावर आताच बोलणे घाईचे ठरेल असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.


गुजरात निवडणूक ट्रेलर, राजस्थान इंटरव्हल, 2019 चा पिक्चर अभी बाकी हैं-  शिवसेना

Post a Comment

 
Top