![]() |
मुंबई- कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीतील मुख्य आरोपी व One Above पबचे तीन मालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. कृपेश आणि जिगर या दोन भावांना त्यांच्या वकिलांच्या घराबाहेर पकडले. दोघे अटक टाळण्यासाठी व कायदेशीर मार्ग शोधण्यासाठी वकिलाजवळ गेले होते. तर अभिजीत मानकर याला या दोघांनी दिलेल्या माहितीनंतर अटक करण्यात आली. 29 डिसेंबरला झालेल्या अग्नीकांडानंतर हे आरोपी फरार झाले होते. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर एक लाखाचे बक्षिस जाहीर केले होते.
मोजोस बारचा मालक अजूनही फरार-
- दरम्यान, वरील दोघांना आपल्या घरात आश्रय देणा-या आणखी एक हॉटेल मालक विशाल कारिया याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती.
- विशाल कारिया हा पब, रेस्टांरंटमध्ये काळा पैसा लावत असे. तो बुकी असून, अनेक क्रिकेटर्स यांच्यासह सेलिब्रेटिजसोबत त्याची ऊठबस आहे. - विशाल कारियाच्या माहितीवरूनच मुंबई पोलिसांनी कृपेश संघवी, जिगर संघवीला अटक केली आहे. - पोलिसांनी माहिती मिळाली की, संघवी बंधू वेस्ट लिकिंग रोडवर वांद्र्यात येत आहेत. - मग पोलिसांनी साध्या वेशात त्यांच्यावर पाळत ठेवली व त्यानंतर तासाभरात वकिलाच्या घराबाहेर त्यांना अटक केली. - या तिघांवर 14 जणांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोजोज रेस्टांरंटचा मालक युग तुली अजूनही फरार चालला आहे. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment