0
नवी दिल्ली- येत्या २७ व २८ जानेवारी आयपीएल संघ आणि क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दोन्ही दिवशी आयपीएलचे आठ संघांसाठी १८२ खेळाडूंवर बोली लागणार आहे. २८ जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत सर्व संघांचे चित्र स्पष्ट होईल. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने केवळ एक-एक खेळाडू परत पाठवला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकता नाइटरायडर्स हे संघ आपल्या जुन्या खेळाडूंवर विश्वास दाखवू शकतात. कारण, त्यांची जुनी चांगली टीम होऊ शकते. त्यांच्या चांगला ताळमेळ देखील आहे. संघाकडे खेळाडू खरेदीसाठी पैसादेखील आहे. सर्व संघांकडे प्रत्येकी ८०-८० कोटी रुपये आहेत. खेळाडूंना परत पाठवण्याबरोबर हे संघांनी आपल्या पैशाकडेदेखील लक्ष ठेवले आहे.
> १७ कोटी रुपये देऊन परत पाठवले विराट कोहलीला. सर्वात महागडा
> १.७ कोटी रुपये मिळाले सर्फराज खानच्या परतीचे. सर्वात कमी
हे खेळाडू होतील परत
महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा (चेन्नई) ऋषभ पंत, क्रिस मॉरिस, श्रेयस अय्यर (दिल्ली), रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह (मुंबई), विराट कोहली, ए.बी. डिव्हिलर्स, सरफराज खान (बंगळुरू), सुनील नरेन, आंद्रे रसेल (कोलकाता), डेव्हिड वार्नर, भुवनेश्वर (हैदराबाद), अक्षर पटेल (पंजाब), स्टीव्ह स्मिथ.
काय आहे राइट टू मॅच कार्ड
लिलावाद्वारे विक्री झालेल्या आपल्या जुन्या खेळाडूला परत खरेदीची कार्डद्वारे फ्रँचायझीला संधी आहे. त्या फ्रँचायझीला खेळाडूवर लागलेली बोलीची रक्कम द्यावी लागेल.
मुंबईकडे सर्वात कमी ४७ आणि राजस्थानकडे सर्वात जास्त ६७.५ कोटी
एका संघात २५ खेळाडू
मुंबई इंडियन्ससह चार संघांनी प्रत्येकी ३-३ खेळाडू परत केले आहेत. त्याकडे ८० पैकी ४७ कोटी शिल्लक आहेत. दुसरीकडे एक-एक खेळाडू परत करणाऱ्या राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन लिलावासाठी ६७.५, ६७.५ कोटी रुपये खर्च करू शकतात. लिलावात एकूण ५७८ खेळाडूंचा सहभाग आहे. एक संघ जास्तीत जास्त २५ खेळाडू घेऊ शकते.
फलंदाज: चालू फॉर्मनुसार ठरणार किंमत
आयपीएलमध्ये अनेक फलंदाज एका सत्रापुरते यशस्वी ठरले आहेत. काही फलंदाजांनी सातत्य ठेवले. परत पाठवलेल्या खेळाडूंपैकी ५ असे फलंदाज आहेत, ज्यांनी गेल्या तीन सत्रांत ३०० पेक्षा अधिक धावा केल्या.
गोलंदाज : १४०+ पेक्षा अधिकचा वेग भारतात चालत नाही
आयपीएल संघ जवळपास १४० पेक्षा अधिक वेग असलेल्या व डावखूऱ्या गोलंदाजांवर मोठी रक्कम खर्च करतात. हे गोलंदाज फलंजांना चेंडू आतमध्ये आणण्यात व विकेट घेण्यात यशस्वी ठरतात. यात मिचेल स्टार्क, मॅक्लिनघन, मुस्तफिजुर रेहमान, मोहंमद शमी, कॅगिसो रबाडा, उनादकट आहेत.

विदेशी फिरकीपटू
१० आयपीएलमध्ये १४ वेळा विदेशी फिरकीपटू सामनावीर ठरले. यात सुनील नरेन ६ वेळा सामनावीर ठरला. चार वेळा शेन वॉर्नला यश मिळाले. रशीद खान, सॅम्युअल बद्री, इम्रान ताहिर, अॅडम जंपा यांच्यावर लक्ष्य आहे.
तीन संघांना हवा नवा कर्णधार
> कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेअर डेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब या तीन संघांना नव्या कर्णधाराचा शोध आहे.
> हे संघ लिलावातील कोणत्याही १६ खेळाडूंवर बोली लावू शकतात. कारण त्यांना कर्णधार बनवता येवू शकते. नंतर इतर खेळाडूंवर लक्ष्य देतील.
> भारतीयांत गंभीर, रहाणे, अश्विन, मनीष पांडे, धवन यांच्या कर्णधारपदासाठी चुरस राहिल. विदेशी खेळाडूत डुप्लेसिस आणि केन विलिम्सन पर्याय आहेत.
१९ वर्षांखालील खेळाडूंवर लक्ष
> भारताचा १९ वर्षांखालील संघ विश्वचषकात क्वार्टर फायनलमध्ये आहे. या संघातील पृथ्वी शॉ, शुभम गिल, कमलेश नागरकोटी, शुभम मावीवर चांगली बोली लागू शकते.
> नियमित युवा खेळाडूंतील राहुल त्रिपाठी, कुणाल पंड्या, नीतीश राणा, मनन व्हेरा, बासिल थम्पीवर देखील सर्वात मोठी बोलीची शक्यता. 
> जोफ्रा आर्चर (विंडिज), डिआर्की शॉर्ट (ऑस्ट्रेलिया), संदीप लामिचाने (नेपाल) यांचे नाव अनेकांनी ऐकले नसले. मात्र, हे देखील बोली चांगला भाव खावू शकतात.Post a Comment

 
Top