0

मुंबई - भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा बंगला रामायण मधील अवैध बांधकामाच्या विरोधात बीएमसीने कारवाई केली. मुंबईच्या जुहू परिसरात सिन्हा यांचे 8 मजली घर आहे. याठिकाणी छतावर आणि ग्राऊंड फ्लोअरवर त्यांना विनापरवानगी टॉयलेट्स आणि पुजा घर तयार केले होते, अशी माहिती मिळाली आहे. महानगरपालिकेने यासाठी त्यांना दोन वेळा नोटीस बजावली होती. पण काहीही उत्तर मिळाले नसल्याने बीएमसीच्या पथकाने सोमवारी अवैध भाग पाडला. शत्रुघ्न सिन्हास, मुलगी सोनाक्षी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब येथे राहते. ही कारवाई सुरू असताना सिन्हा बंगल्यात उपस्थित होते.

2 वेळा नोटीस बजावली
- जुहूच्या जेव्हीपीडी स्कीममध्ये 5 नंबर रोडवर शत्रुघ्न सिन्हा यांचा बंगला आहे. याठिकाणी एका फ्लोअरवर अवैधरित्या टॉयलेट्स, पॅन्ट्री आणि मोकळ्या जागेत ऑफिस तयार करण्यात आले होते. 
- तसेच बीएमसीची परवानगी न घेता गैलरीमध्ये पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या. तसेच बंगल्याच्या सर्व फ्लोअरवर डक्ट एरियामध्ये अतिक्रमण करण्यात आले होते. 
- बीएमसी ऑफिसने ‘एमआरटीपी’ कायद्याच्या कलम 53 (1) अंतर्गत 5 डिसेंबर 2017 आणि 6 जानेवारीला नोटीस जारी केली होती. त्यानंतरही अवैध बांधकाम काढण्यात आले नाही. त्यानंतर सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत ही कारवाई करण्यात आली.

काय म्हणले सिन्हा?
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, बंगल्यामध्ये अत्यंत किरकोळ अतिक्रमण होते. बीएमसी स्टाफने ते हटवण्यास सांगितले होते. सरकार टॉयलेट बनवण्याचे अभियान राबवत आहे, त्यामुळे इमारतीत काम करणाऱ्यांसाठी छतावर टॉयलेट तयार केले होते. बीएमसीच्या कारवाईवर काहीही आक्षेप नाही. मंदिर सध्यासाठी शिफ्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top