0
जळगावमध्ये पारोळा येथे झोका खेळताना गळफास लागल्याने बालकाचा मृत्यू
जळगाव-घरात झाेक्यावर बसून खेळताना गळफास लागून १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाराेळ्यात बुधवारी सकाळी घडली. पवन महाजन असे मृत मुलाचे नाव आहे. पाराेळा येथील माजी नगरसेवक भगवान झगा महाजन यांनी सांगितले की, सकाळी ९ वाजता कैलास महाजन हे घरात झोपले होते. त्यांच्या पत्नी पूजा करत होत्या, तर मोठा मुलगा पवन हा घरात मागील बाजूस असलेल्या झोक्यावर खेळत हाेता. झाेका फिरवत असताना त्याला झाेक्याच्या दाेरीचा गळफास बसला. वडील कैलास महाजन हे मागील खोलीत रुमाल घेण्यासाठी गेले असता पवन हा गळफास बसलेल्या स्थितीत अाढळला.

त्याची जीभ बाहेर निघालेली पाहून त्यांनी पत्नीला बोलावले. त्यानंतर सुरीने दाेर कापून पवनला प्रथम खासगी रुग्णालयात नेण्यात अाले. त्यानंतर कुटीर रुग्णालयात अाणले असता डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घाेषित केले. दरम्यान, पवन याच्या मृत्यूनंतर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

 
Top