0
पुणे-
        कात्रज येथील जुन्या बोगद्याजवळ एका सुरक्षा रक्षकाचा डोक्यात दगड आणि चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेचे अद्याप कारण समजू शकले नाही. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील जुन्या बोगद्याजवळ आरिफ पठाण (वय 45) या सुरक्षा रक्षकाचा दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास डोक्यात दगड घालून आणि चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या खुनाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यात कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ डोक्यात दगड घालून सुरक्षा रक्षकाचा खून

Post a Comment

 
Top