![]() |
मुंबई- पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद सायंकाळी चार वाजता मागे घेत असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. हा बंद यशस्वी झाला आहे. राज्यातील जनतेने संयम, शांतता राखत पाठिंबा दिल्याबाबत आम्ही त्यांचे अभिनंदन करतो व आभार मानतो असे आंबेडकर यांनी सांगितले. सोबतच या हिंसाचाराचे सूत्रधार संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि स्थानिक नेता घुगे यांच्यावर तत्काळ कारवाई अशी मागणी पुन्हा एकदा आजच्या पत्रकार परिषदेत केली.
पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर आज (बुधवार, 3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅंड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या 'महाराष्ट्र बंद' घोषणेचे पडसाद मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरात उमटले. मुंबईत बेस्टची वाहतूक सुरळित सुरू आहे. आज सकाळी काही कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले. ठाण्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे शहरात शांतता आहे. बहुतेक लोकांनी खबरदारी म्हणून आज सकाळपासून दुकाने, मॉल बंद आहेत. पुण्यातील शाळांना, काही कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहतूकही तुरळक आहे. पुणे-बारामती बस सेवा बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदचे राज्यातील प्रमुख शहरात पडसाद उमटत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
LIVE UPDATE:
-मुंबईत 13 बेस्ट बसची तोडफोड, खासगी वाहने तोडली, जाळली. सायन, चेंबूर, घाटकोपर परिसरातील आंदोल आणखी आक्रमक
- मुबईतील घाटकोपर परिसरात आंदोलकांनी टायर जाळून परिसरात बंद पाडला.
- पुण्यातील सुखसाखर भागात आंदोलकांनी वाहनांवर दगडफेक केली. तसेच एकबोटे यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी आंदोलन आक्रमक मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
- सकाळच्या सत्रात रेल्वे रोको, बस अडवल्या गेल्या तसेच रिक्षाही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र हळू हळू स्थिती पूर्वपदावर येत आहे.
- मुंबईतील एसी लोकलच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.
- चेंबूर, घाटकोपर, रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील आंदोलक आक्रमक
- रास्ता रोकोमुळे ईस्टर्न एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी.
- मुंबईतील एसी लोकलच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.
- चेंबूर, घाटकोपर, रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील आंदोलक आक्रमक
- रास्ता रोकोमुळे ईस्टर्न एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी.
- पुणे- मिलिंद एकबोटे यांच्या सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळील घरावर आंदोलक मोर्चा काढणार
- नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पसरवूही नये. तुमचे दैनंदिन कामकाज सुरु ठेवा. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सज्ज: मुंबई पोलिस
- ठाण्यात रिक्षा सेवा सुरू, विरारमध्ये आंदोलकांनी रेल्वे अडवली.
- नवी मुंबई- सीएसटी-पनवेल हार्बर रेल्वे लाईन सुरु, ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर सुरळीत
- ठाण्यात आंदोलकांनी महामार्गावर बस थांबवले. विरारमध्ये रिक्षा, शाळा बंद, नालासोपारा आणि वसईमध्ये बंदला समिश्र प्रतिसाद

तणावपूर्ण स्थिती पण पूर्ण नियंत्रणात परिस्थिती-
पुणे जिल्ह्याच्या भीमा कोरेगावजवळ सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद तिस-या दिवशीही राज्याच्या काही भागात उमटत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. भारिप, बहुजन महासंघ, महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र लेफ्ट फ्रंटसह अनेक दलित व डाव्या संघटनांचा आजच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर यांच्यासह शरद पवार, रामदास आठवले आदी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Post a Comment