0
मुंबई/नवी दिल्ली- जनता पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे त्रस्त आहे आणि सरकारी तेल कंपन्या मात्र नफा वाढवत आहेत. याचे उदाहरण आहे सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइलचे (आयओसी) तिमाही निकाल. आयओसीने मंगळवारी जाहीर तिसऱ्या तिमाहीच्या निकालात कंपनीचा नफा दुप्पट वाढल्याचे म्हटले आहे. २०१६च्या डिसेंबर तिमाहीत ३,९९९.९१ कोटी असलेला नफा ९७% वाढून ७,८८३.२२ कोटी झाला. याचे कारण म्हणजे कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त कच्चे तेल खरेदी केले, मात्र पेट्रोल-डिझेल चढ्या दराने विकले. त्यामुळे मार्जिन प्रचंड वाढले. महसुलाच्या हिशेबाने इंडियन ऑइल देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.
> नफ्यानंतर आयओसी प्रतिशेअर १९ रु. डिव्हिडंड देईल.
> आपला खिसा रिकामा अन् कंपनीचा नफा वाढतच गेला; २ मोठे पुरावे
पहिला : आयओसीचा नफा ९७% वाढला, मात्र महसूल फक्त १३% वाढला आहे. आधी तो १.१५ लाख कोटी होता. आता १.३० लाख कोटी रुपयांवर गेला आहे. 
दुसरा : प्रमाणाच्या हिशेबाने गतवर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत देशांतर्गत बाजारात विक्री फक्त ४.१% वाढली आणि रिफायनरी प्रोसेसिंगही ११.४%वाढली आहे.
> 2.09 कोटी टन इंधनाची विक्री केली आयओसीने डिसेंबर तिमाहीत. ४.१% वाढीसह.
> 1.82 कोटी टन क्रूडची रिफायनिंग केली कंपनीने. केवळ ११.४% वाढीसह.
> इन्व्हेंट्रीतून नफ्याचा ८०% हिस्सा : आयओसीच्या नफ्याचा ८०% हिस्सा इन्व्हेंट्रीवरील लाभातून. कंपनीने निर्धारित दराने क्रूड खरेदी केले. प्रक्रियेनंतर विकायला गेले तर क्रूड महागले. यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. यातून कंपनीला जो अतिरिक्त नफा झाला त्याला इन्व्हेंट्री गेन म्हटले जाते. 
- ग्रॉस रिफायनिंग मार्जिन ६०% हून जास्त वाढले. ७.६७ डॉलरहून १२.३२ डॉलर प्रतिबॅरल झाले.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सरकारी कंपनी इंडियन ऑइलचा नफा दुप्पट; तिमाहीतील निकाल

Post a Comment

 
Top