0
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या साराशी फाेनवरून गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबई पाेलिसांनी काेलकाता येथून देबकुमार मैती (३२) या तरुणाला अटक केली. हा तरुण गेल्या काही दिवसांपासून फाेन करून तिला त्रास देत असल्याची तक्रार तेंडुलकर कुटुंबीयांनी बांद्रा ठाण्यात केली हाेती.

मला साराशी लग्न करायचे अाहे, असे मैती वारंवार फाेनवर म्हणायचा. त्याची अनेकदा समजूत काढूनही त्याने फाेन करणे सुरूच ठेवले. अखेर सचिनने बांद्रा ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची त्वरित दखल घेऊन मुंबई पाेलिसांनी चाैकशी सुरू केली. प. बंगालमधील पूर्व मिदनापूर येथील महिसादाेल भागातून हे फोन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार, प. बंगाल पोलिसांच्या मदतीने मैती याला अटक केली.
अटक केलेला देवकुमार मैती... (डावीकडे)
Add caption

Post a Comment

 
Top