नवी दिल्ली - संजय लीला भंसाळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद संपुष्टात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने चित्रपटावर बॅन लावणाऱ्या राज्यांना धक्का देत चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवी झेंडी दाखवली आहे. राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांनी चित्रपटावर भॅन लावला होता. या राज्यांनी काढलेल्या चित्रपटाच्या बंदीच्या अधिसूचनेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. जर बँडिट क्वीन चित्रपट रिलीजो होऊ शकतोतर पद्मावत का नाही, असा प्रश्न सरन्यायाधीश दीपक मिश्रांनी उपस्थित केला.
सुप्रीम कोर्टातील सुनावणीचे महत्त्वाचे मुद्दे3.
- देशभरामध्ये 25 जानेवारी रोजी 'पद्मावत' चित्रपट रिलीज करण्याचा मार्ग मोकळा.
- ज्या राज्यांनी 'पद्मावत' चित्रपटांवर बॅन करण्याच्या अधिसूचना काढाल्या आहेत. त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे.
- इतर राज्यांनी या चित्रपटाविरोधात अशा प्रकारच्या अधिसूचना काढण्यासही मनाई करण्यात आली.
- राज्यांना चित्रपट प्रदर्शनादरम्यान कायदा व सुव्यवस्था पाळणे बंधनकारक असल्याचे निर्देश.

या प्रकरणी 'पद्मावत'च्या निर्मात्यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात दाव घेतली होती. सेंसॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतरही अनेक राज्यांनी बॅन का लावला, असे याचिकेत म्हटले होते. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. पद्मावती चित्रपटाबाबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. अनेक दिवस सेंसॉरच्या परवानगीसाठी हा चित्रपट रखडला. त्यानंतर 5 बदलांसह हा चित्रपट रिलीज करण्यास सेंसॉर बोर्डाने परवानगी दिली होती. त्यानुसार चित्रपटाच्या रिलीजसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. पण तरीही राजस्थानने हा चित्रपट रिलीज करणार नसल्याचे स्पष्ट करत चित्रपटावर बॅन लावला. त्यापाठोपाठ गुजरात आणि मध्य प्रदजेशातही चित्रपट बॅन झाला. सोमवारी हरियाणा सरकारनेही चित्रपट बॅन करण्याची घोषणा केली. त्यामुळे निर्मात्यांकडे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अखेर गुरुवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने भाजप सरकारला धक्का देत चित्रपट प्रदर्शित करण्याचे आदेश दिले.
IMAX 3D मध्ये रिलीज होणार पद्मावत
- पद्मावतचे निर्माते भन्साळी प्रोडक्शन आणि वायकॉम 18 मोशन पिक्चर्सने रविवारी सांगितले की फिल्म जगभरात एकाचवेळी IMAX 3Dमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगु या तिन्ही भाषांमध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.

Post a Comment