![]() |
औरंगाबाद- कोरेगाव-भीमा, सणसवाडी, शिक्रापूर कोंढापुरी येथे संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीचे पडसाद औरंगाबादसह जिल्ह्यात उमटले आहेत. शहरातील काही भागात किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. यात तीन जण जखमी झाले आहेत. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी फौजदारी दंडप्रक्रिया संहिता सन 1973 चे कलम 144 (1)(3) नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
यामुळे दोन समाजात निर्माण झाली तेढ...
पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील दोन गटांतील वाद शांत झाल्यानंतर विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर काल (सोमवारी) सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले अन् काही क्षणात परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली. दोन गटात वाद झाल्याने घोषणाबाजी होऊन वाद चिघळला आणि त्याचे पर्यवसन दगडफेक, वाहने जाळणे व मालमत्तेचे नुकसान करण्यात झाले. यावेळी पुणे- नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव, वढू बुद्रुक रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापूरी या भागात अनेक वाहनांची व दुकानांची नासधूस व तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
जातीय द्वेष पसरविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिरुर हवेली तालुक्यात दोन जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्यभर मोठ्या प्रमाणावर अफवांचे पेव पसरले. त्यामुळे पोलिसांनी जनतेला अफवांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. जातीय द्वेष पसरविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही दिला अाहे.
या घटनेनंतर राज्यभर अफवांचे पीक पसरले. त्याचे पडसाद औरंगाबाद पाठोपाठ बीड, परभणी, हिंगोली, लातूर, सोलापूर आदी शहरातही उमटले आहेत.
|
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment