0
काेरेगाव भीमा: राहुल फटांगळे हत्याप्रकरणी अहमदनगरचे तिघे अटकेत, दंगलीप्रकरणी पाच ताब्यात
पुणे-काेरेगाव भीमा परिसरात एक जानेवारी राेजी दाेन गटात जातीय तणाव हाेऊन दंगल उसळली हाेती. या वेळी झालेल्या हिंसाचारात राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी अज्ञात जमावावर खुनाचा 
 गुन्हाही दाखल झाला हाेता. घटनेच्या दहा दिवसांनंतर पाेलिसांनी याप्रकरणी नगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रीक (ता. श्रीगाेंदा) येथील तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली अाहे. तसेच सणसवाडी येथे झालेल्या दंगलीतील पाच दंगलखाेरांनाही जेरबंद करण्यात अाले अाहे.

या हिंसाचाराचा तपास सुरू असताना पुणे ग्रामीण पाेलिसांनी सुमारे २ हजारांहून अधिक व्हिडिअाे क्लिप, माेबाइल काॅल डिटेल रेकाॅर्ड, माेबाइल सिम डाटा, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक साहित्याची तपासणी केली. यातून मिळालेल्या पुराव्यांच्या अाधारे पाेलिसांनी राहुलच्या मृत्युप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील तीन अाराेपींना अटक केली. संबंधित अाराेपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचेही पाेलिसांचे म्हणणे अाहे. त्या अाधारावर पाेलिस अाता पुढील तपास करत अाहेत. १ जानेवारीला काेरेगावप्रमाणे सणसवाडीतही हिंसाचार झाला हाेता. यात ५ जणांना अटक करण्यात अाली. अातापर्यंत एकूण ५१ जणांना अटक केलेली अाहे.

९.५ कोटी नुकसान
काेरेगाव भीमा परिसरात १ जानेवारी राेजी झालेल्या हिंसाचारात सार्वजनिक अाणि खासगी मालमत्तेचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. याप्रकरणी नुकसानीचा पंचनामा जिल्हा प्रशासनाने नुकताच पूर्ण केला. त्यानुसार या दंगलीत एकूण ९ काेटी ४८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले अाहे.
राहुलची केस निकम यांच्याकडे द्या- नातेवाईक
कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी राहुलचा मावस भाऊ तेजस धावडे यांनी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तेजस धावडेने ही मागणी केली. या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय जाधव, तुषार काकडे यांचीही उपस्थित होते.


Post a Comment

 
Top