0
अभिनेते धर्मेंद्र यांचा पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुले सनी-बॉबी देओल यांच्यासोबतचा एक फोटो समोर आला आहे. सनी आणि बॉबी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आईवडिलांसोबतचा हा फोटो शेअर केला आहे. निमित्ता होते न्यू इयर सेलिब्रेशनचे. सनी देओलने आईवडील आणि भाऊ बॉबीसोबतचा हा फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, "Happy new year. #newyear #love"

दीर्घ काळानंतर एका फ्रेममध्ये दिसली देओल फॅमिली..
धर्मेंद्र यांनी हेमामालिनीसोबत नव्हे तर पहिली पत्नी प्रकाश कौरसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ब-याच वर्षांनी धर्मेंद्र यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा फोटो समोर आला आहे. या दोघांची जुनी छायाचित्रे वगळली असता, गेल्या काही वर्षांतील एकही फोटो कधीच समोर आला नव्हता. सनी आणि बॉबीसोबतची धर्मेंद्र यांची अनेक छायाचित्रे माध्यामांमध्ये येत असतात. पण प्रकाश कौर यांच्यासोबत ते कधीच दिसले नाहीत. त्यामुळे देओल फॅमिलीचा हा फोटो वेगळा ठरला आहे.
वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी केले होते पहिले लग्न.. सिनेसृष्टीत व्हायची होती एन्ट्री...
4 डिसेंबर 1935मध्ये पंजाबमध्ये जन्मलेले धर्मेंद्र यांचे पहिले लग्न वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते. प्रकाश कौर हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आणि दोन मुली आहेत. सनी, बॉबी, अजीता आणि विजेता ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. पहिले लग्न झाले तेव्हा धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत नव्हते. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर त्यांची सिनेसृष्टीत एन्ट्री झाली होती.

Post a Comment

 
Top