0
पुणे-
       कोरेगाव-भीमा प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी मिलिंद एकबोटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. काेरेगाव-भीमा येथे एक जानेवारी राेजी दाेन गटात दंगल घडल्यानंतर समस्त हिंदु अाघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे यांच्यावर शिक्रापूर याठिकाणी अॅट्रासिटी व इतर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. न्यायालयाने सदर प्रकरण गंभीर असल्याचे सांगत, एकबाेटे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पुणे ग्रामीण पाेलिस एकबाेटे यांना अटक करण्यासाठी त्यांचा शाेध घेत आहेत.
एकबाेटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता त्यांनी, वकीलांमार्फत पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता. मात्र, न्यायालयाने दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद एेकून घेत एकबाेटे यांचा अर्ज फेटाळून लावल्याने, त्यांच्या समाेरील अडचणीत वाढ झाली अाहे. एकबाेटे यांना अटक करण्यासााठी पाेलिसांना मार्ग माेकळा झाला असला तरी मुंबर्इ उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी एकबाेटे यांनी अर्ज केला आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरण : मिलिंद एकबोटे यांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव

Post a Comment

 
Top