मुंबई: 13 जून 1997 रोजी रिलीज झालेला 'बॉर्डर' हा सुपरहिट चित्रपट देशभक्तीवर आधारित होता. सनी देओलसह अनेक मोठे स्टार्स या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरबानी मुखर्जी तुमच्या नक्कीच लक्षात असेल. शरबानीच्या तिच्या सौंदर्याने सगळ्यांना भूरळ घातली होती. या चित्रपटाच्या रिलीजला आता 20 वर्षांचा काळ लोटला आहे. एवढ्या वर्षांत अतिशय मोजक्या चित्रपटांमध्ये शरबानीचे दर्शन प्रेक्षकांना घडले. याकाळात तिचा लूकसुद्धा अतिशय बदलला आहे. चित्रपटामध्ये झळकलेल्या शरबानीचे लेटेस्ट फोटोज बघता ती हीच आहे, यावर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही.




Post a Comment