0
आश्वासनानंतर नांदेडच्या विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार; लाठीमारात झाला हाेता मृत्यू
हिंसाचाराच्या घटनांनंतर सोशल मीडियावर द्वेषपूर्ण टाकल्या जाणाऱ्या पोस्टमुळे परिसनांदेड- काेरेगाव भीमातील हिंसाचाराविराेधात हदगाव तालुक्यातील आष्टी येथे रास्ता रोको करण्यासाठी जमलेल्या युवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. या लाठीहल्ल्यात बुधवारी आष्टी येथील योगेश प्रल्हाद जाधव (१६) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्याच्या नातेवाइकांनी घेतला होता. दरम्यान, गुरुवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री योगेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डाेक्याला मार लागल्याने योगेश जाधवचा बुधवारी मृत्यू झाला हाेता. त्यामुळे गुरुवारीही हदगाव तालुक्यात तणावपूर्ण वातावरण होते. योगेशच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका योगेशच्या नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे पोलिसांसह प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी योगेशच्या नातेवाइकांशी संपर्क साधून याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने गुरुवारी रात्री चोख पोलिस बंदोबस्तात योगेश जाधव याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नांदेडमध्ये इंटरनेट बंदरात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण हाेऊ नये म्हणून गुरुवारी दुपारपासूनच जिल्हा प्रशासनाने माेबाइल इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यामुळे नांदेड शहरासह जिल्ह्यातील बँकिंगसह सर्व व्यवहार ठप्प झाले होते. ही यंत्रणा शुक्रवारी दुपारपर्यंत बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

 
Top