0
सागरी परिक्रमेवर निघालेल्या महिला अधिकाऱ्यांचा वादळाशी सामना, 'दाखवले अलौकिक शौर्य'
नवी दिल्ली - जगाच्या परिक्रमेवर निघालेल्या भारतीय नौदालाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा प्रशांत महासागरात समुद्री वादळाशी सामना झाला. फॉकलँड आयलंड येथे पोहोचत असताना आलेल्या या वादळाचा महिला अधिकाऱ्यांनी मोठ्या बहादुरीने सामना केला. महिला अधिकाऱ्यांनी वादळातून आपली नौका (INSV तारिणी) सुखरुप बाहेर काढली. वादळाशी सामना करतानाचा महिला अधिकाऱ्यांचा व्हिडिओ नौदलाने जारी केला आहे.
महिला अधिकाऱ्यांनी धैर्याने केला वादळाशी सामना
- नौदलाने महिला अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतूक केले आहे. नौदलाने म्हटले आहे, की महिला अधिकाऱ्यांनी मोठ्या हिंमतीने वादळाचा सामना करत आपली नौका वादळातून बाहेर काढली. 
- भारतीय नौदलाच्या 6 महिला अधिकारी 55 फूटांच्या नौकेवरुन 6 महिन्यांच्या समुद्री परिक्रमेवर निघाल्या आहेत. महिला अधिकाऱ्यांनी समुद्रात जहाज चालवण्याचे रितसर प्रशिक्षण घेतलेले आहे.
सप्टेंबरमध्ये रवाना झाली महिला टीम
- 10 सप्टेंबरला महिला अधिकाऱ्यांची टीम सागरी परिक्रमेवर निघाली होती. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी पणजी येथे महिला अधिकांऱ्याच्या टीमला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले होते. 
- ही जगातील पहिली नौका आहे ज्यावर सर्व क्रू मेंबर्स या महिला आहेत.

Post a Comment

 
Top