0
सिन्नर- सोनेवाडी येथील मित्राच्याच पत्नीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना काल (शुक्रवार) रात्री 11 च्या सुमारास घडली. घटनेनंतर फरार झालेल्या संशयितांना चितेगाव फाटा (ता. निफाड) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. सिन्नर न्यायालयाने त्यांची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली.

पीडित 27 वर्षीय महिलेच्या पतीला 9 वाजेच्या सुमारास फोन आल्यानंतर तो बाहेर गेला होता. ही संधी साधत रात्री 11 वाजेच्या सुमारास हेमंत ऊर्फ सुनीलसिंग परदेशी, बाळासाहेब ऊर्फ बाजीराव बबन बर्डे (दोघे रा. सोनेवाडी) यांनी पाठीमागच्या दरवाजाने प्रवेश केला. यावेळी दोन्ही मुले झोपलेली होती. पीडित महिलेला आवाज आल्यानंतर ती पाहण्यासाठी गेली असता दोघांनी तिला पकडून बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसांत केली आहे.

महिलेने लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक रणजित आंधळे यांनी वैद्यकीय तपासणीसाठी महिलेला जिल्हा रुग्णालयात पाठवले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संशयितांना ताब्यात घेतले. निफाडचे उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अशोक कर्पे यांनी वावी पोलिस ठाण्यात धाव घेत माहिती घेतली. संशयितांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोनेवाडीत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनेचा छावा संघटनेने घटनेचा निषेध केला आहे. आरोपींना कडक शिक्षा करण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेने पोलिसांना दिले. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर अण्णा खाडे, मयूर पांगारकर यांच्या सह्या आहेत.

मुले झोपलेली पाहून दोन नराधमांनी केला मित्राच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार

Post a Comment

 
Top