0
सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरुन विवाहितेची चिमुरडीसह उडी घेवून आत्महत्या

नाशिक-वणी येथील सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून अडीच वर्षीय चिमुरडीसह एका विवाहितेने उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काल (गुरुवार) गडाच्या पायथ्याशी मायलेकीचा मृतदेह आढळून आला आहे.
सूत्रांनुसार, सप्तश्रुंगी गडावरुन दरीचे फोटो काढणाऱ्या भाविकांना या मायलेकीचे मृतदेह दिसले. नंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
कोण होती विवाहिता...?
- कांचन निफाडे असे अात्महत्या केलेल्या महिलेची नाव आहे. ती निफाड तालुक्यात शिरवाडे वणीमध्ये येथील राहाणारी होती.
- कांचन निफाडे आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह मंगळवारपासून (9 जानेवारी) बेपत्ता होती.
- मायलेकीचा शोध सुरु असतानाच भातोडे शिवारात त्यांचे मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

 
Top