![]() |
भोपाळ- निशातपूरा परिसरात ऑनर किलिंहचे प्रकरण समोर आले आहे. कॉलनीतील मुलासोबत मुलगी पळून गेल्याने संतापलेल्या वडिलांनी आपल्या साल्यासोबत मिळून तरूणाच्या छोट्या बहिनीला जिवंत जाळले होते. यामध्ये गंभीर भाजलेल्या तरूणीने मृत्यूपूर्वी पोलिस आणि मॅजिस्ट्रेट समोर आपला जबाब नोंदवला आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण... - पोलिसांनी दोन्ही आरोपींना अठक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाल्यान संतापलेल्या कुटुंबियांनी पोलिसांवर देखील त्रास दिल्याचा आरोप केला आहे. - हाउसिंग बोर्ड लाल क्वार्टर, नशातपूरा येथील रहिवाशी आशु चौरसिया खाजगी ठिकाणी काम करत आहे. - गेल्या 1 जानेवारीला त्यांचा 21 वर्षीय छोटा भाऊ दीपक उर्फ कल्लू चौरसिया शेजारी राहणाऱ्या तरूणीसोबत पळून गेला होता. - तरूणीच्या नातेवाईकांनी अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. आशुने आरोप केला, की त्यानंतर तरूणीचे वडील राधामोहन अग्निहोत्री पोलिसांसोबत घरी येऊन धमकी देत होते. - रविवारी रात्री देखील ते घरी आले. त्यावेळी त्यांची छोटी बहिण नैना(17) घरी एकटी होती. आम्हाला सांगण्यात आले की, नैनाने स्वत:ला पेटवून घेतले, परतु राधामोहन आणि त्याचा साला अमित तिवारी यांनी तिला जाळले होते. - आम्हाला तिला भेटू दिले नाही. पोलिस सतत तिच्यावर दबाव टाकत होते. पाण्यासाठी तडपत होती मुलगी... नैनाचा मृत्यूपू्र्वी बनवण्यात आलेला व्हिडिओमध्ये नैना त्रासामुळे किंचाळताना दिसत आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्य्क्तीला नैना रडत रडत पाणी मागतले होते, तरी समोरचा व्यक्ती तिला थोडा वेळ थांबण्यास सांगत राहिला, तेव्हा ती म्हणाली की, मी मेली तेव्हा पाणी देणार का?
तीन लोक आले आणि लवाली आग...
- नैनाने मृत्यूपूर्वी आधी मॅजिस्ट्रेटसमोर जबाब दिला. यात तिनने सांगितले की, शनिवारी रात्री अंदाजे 8 वाजता घरी एकटी होते. - या दरम्यान राधामोहन आपला साला अमित तिवारी आणि अन्य एका व्याक्तीसोबत घरी पोहोचले. - जोरजोरात दरवाजा वाजवण्यास सुरूवात केली, जसा मी दरवाजा उघडला त्यांनी माझ्यावर रॉकेल ओतून आग लावली. - आग लावल्यावर तिघेही पळून गेले. त्यानतंर काहीच आठवत नाही. उपचारादरम्यान रात्री नैनाचा मृत्यू झाला. - पोलिसांनी मृत्यूपूर्वी नोदवलेल्या जबाबाच्या आधारावर राधामोहन आणि अणित तिवारीला अटक केली आहे. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment