0
पुणे- संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपट आज पुण्यातील विविध थिएटर आणि मल्टिफ्लेक्समधील सुमारे 90 स्क्रीनवर झळकला आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, प्रत्येक थिएटरबाहेर 20-25 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या पुण्यात या चित्रपटाचे शो व्यवस्थितपणे सुरू आहेत. तरूणांनी या चित्रपटाला गर्दी केली आहे. तसेच चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही, उलट रजपूत समाज, त्यांचा इतिहास उत्तम पद्धतीने मांडला आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
करणी सेनेकडून वाहनांची ताेडफाेड, 25 जणांविराेधात गुन्हा दाखल-
दिग्दर्शक संजय लिला भन्साळी निर्मिती ‘पदमावत’ चित्रपटास सर्वाेच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर, रजपूत करणी सेनेच्या सुमारे 20 ते 25 कार्यकर्त्यांनी पुणे-बंग्लाेर हायवेवर वडगाव ब्रिज येथे मंगळवारी रात्री पावणेबारा वाजता रास्ताराेकाे करत वाहनांची ताेडफाेड केली. याप्रकरणी महेश लक्ष्मण भापकर (वय- 30, रा. कल्याण, जि. ठाणे) यांनी सिंहगड राेड पाेलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पाेलीसांनी करणी सेनेच्या संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन 15 जणांना अटक केली अाहे.
महेश भापकर हे ट्रान्सपाेर्ट व्यवसायिक असून ते त्यांची अायशर गाडीत माल भरुन साखरवाडी येथुन कुर्ला चेंबुर येथे डिलीवरी करणेकामी मंगळवारी रात्री हायवेवरुन जात हाेते. त्यावेळी वडगाव ब्रिजवर सर्व्हिस राेड लगत, अचानक सुमारे 20 ते 25 लाेकांनी ट्रकच्या समाेर भगवे झेंड हातात घेवुन गाडी थांबवुन गाडीचे पुढील काचेवर काठयाने मारुन काच फाेडली. तसेच गाडीच्या टायर मधील हवा साेडन देवुन त्यांच्या गाडीच्या मागील बाजूस थांबलेल्या सुमारे अाठ ते दहा वाहनांचे काचा फाेडून व टायर मधील हवा साेडून नुकसान केले. याप्रकारामुळे सार्वजनिक रस्त्यावर वाहनांची गर्दी हाेऊन वाहतुक काेंडी झाली. यावेळी सदर कार्यकर्त्यांनी हातातील झेंडे उंचावून ‘अाम्ही पदमावत पिक्चर प्रदर्शित हाेऊ देणार नाही’ अशाप्रकारे घाेषाणा देवुन गाेंधळ घातला. याप्रकरणी पुढील तपास पाेलीस निरीक्षक (गुन्हे) बी.एल.खाेडदे करत अाहे.
थियटर बाहेर अांदाेलन करणार-
अखिल राजस्थानी समाज संघ,पुणेचे अध्यक्ष अाेमसिंग भाटी यांनी सांगितले की, पद्यावत चित्रपटाला विराेध म्हणून वडगाव धायरी परिसरात अांदाेलन करणाऱ्या अामच्या कार्यकर्त्यांना पाेलीसांनी अटक करुन त्यांना मारहाण केली अाहे. कार्यकर्त्यांनी वाहनांच्या काचा फाेडल्या, हवा साेडली मात्र काेणत्या व्यक्तीस मारहाण केली नाही अथवा लुटमारी केली नाही तरी पाेलीसांनी कार्यकर्त्यांवर लुटमारीचा गुन्हा दाखल केला अाहे. पदमावत चित्रपटाला अामचा विराेध कायम असून गुरुवारी पुण्यातील थियटर बाहेर सदर चित्रपट दाखविण्यात येऊ नये याकरिता निर्देशने करण्यात येणार अाहे. जनतेच्या भावनांची सरकारने दखल घ्यावी.

Post a Comment

 
Top