![]() |
वॉशिंग्टन/ संयुक्त राष्ट्र- संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी पाकिस्तानला १६२६ कोटी रुपयांची लष्करी मदत रद्द केल्याच्या वार्तेला दुजोरा दिला आहे. याच्या काही तासांनंतरच व्हाइट हाऊसच्या वतीने प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले. येत्या २४ ते ४८ तासांत आम्ही तुम्हाला याविषयी मोठ्या निर्णयांची बातमी देणार आहोत. हे निर्णय कठोर असतील, असे या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. १ जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की, पाकने अमेरिकेकडून ३३ अब्ज डॉलर्स (भारतीय चलनात २.१४ लाख कोटी रुपये) गेल्या १५ वर्षांत घेतले. निक्की हेली यांनी बुधवारी म्हटले की, पाकिस्तान वर्षानुवर्षे अमेरिकेशी दुहेरी चाल चालत आला आहे.
अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हीदर न्यूरेट यांनी म्हटले की, पाकिस्तान आमचा प्रमुख मित्र आहे. आशिया क्षेत्रात अमेरिकेचे धोरण काय आहे याची जाणीव पाकला आहे. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment