0
इस्रायलच्या या पंतप्रधानांनी केले 3 विवाह, जिवाची बाजी लावून वाचवले होते विमान

- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ते आपल्या पत्नी सारा यांच्यासमवेत 6 दिवसांच्या दौऱ्यावर असून भारतातील विविध स्थळांना भेटी देत आहेत. त्यांच्या भारत दौऱ्यानिमित्त  त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती देत आहे.
असे बनले पंतप्रधान...
- नेतन्याहू यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1949 रोजी नव्याने स्थापित झालेल्या तेल अवीव इस्रायलमध्ये झाला. 1967 मध्ये ते इस्रायलच्या संरक्षण दलात सामिल झाले. यानंतर 'सय्यद मट्टल' ऑपरेशन दलात प्रवेश घेऊन त्या मोहिमेचे नेतृत्व केले. 1972 मध्ये त्यांनी हायजॅक झालेले जहाज वाचवले होते. 
- यानंतर 1976 मध्ये अमेरिकेत परतले आणि मॅसाच्युसेट्स इस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी येथून आर्किटेक्ट आणि बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली. 
- ते इस्रायलचे 9 वे आणि विद्यमान पंतप्रधान आहेत. ते केनेट आणि लिकुड पार्टीचे अध्यक्ष देखील आहेत. याव्यतिरिक्त नव्याने स्थापित इस्रायलमध्ये जन्म घेणारे ते पहिले पंतप्रधान आहेत.
तीनपैकी एका भावाचा मृत्यू
- आपले सर्वात मोठे बंधू योनी यांच्या मृत्यूनंतर नेतन्याहू इस्रायलला परतले. योनी यांचा मृत्यू युगांडा येथे हायजॅक केलेल्या विमानाची सुटका करून घेताना मृत्यू झाला होता. 
- बेंजामिन नेतन्याहू यांना आणखी दोन भाऊ आहेत.
तीन वेळा केला विवाह
- नेतन्याहू यांनी तीनदा विवाह रचला आहे. पहिल्या पत्नीचे नाव मिरियम वीझमन असे होते. 1972 ते 1978 पर्यंत टिकलेल्या या विवाहामध्ये त्यांना नोआ नामक एक मुलगी झाली. 
- फ्लेर कॅट्स नावाच्या महिलेसोबत त्यांनी दुसरा विवाह केला. 1981 ते 1984 पर्यंत टिकलेल्या या विवाहानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 
- नेतन्याहू यांच्या तिसऱ्या आणि विद्यमान पत्नी सारा ह्या मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांना दोन आपत्ये असून येयर आणि अवनेर अशी त्यांची नावे आहेत.
दहशतवादावर लिहिली अनेक पुस्तके...
त्यांनी दहशतवाद विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये 'सेल्फ-पोर्ट्रेट ऑफ द हिरो: द लेटर्स ऑफ जोनाथन नेतन्याहू (1963-76), इंटरनॅशनल टेरररिझ्म: चॅलेंज अॅन्ड रिस्पाँस (1979), टेरररिझ्म: हाऊ द वेस्ट कॅन विन (1987), द प्लेस इन द नेशन्स: इस्रायल अॅन्ड द वर्ल्ड (1992), फायटिंग टेररिझ्म: हाऊ डेमोक्रेसीझ कॅन डिफीट डॉमेस्ट‍िक अॅन्ड इंटरनॅशनल टेरररिज्म (1996) इत्यादींचा समावेश आहे.

Post a Comment

 
Top