0
जेरुसलेम - 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आपल्या आई-वडिलांना गमावणारा पीडित इस्रायली मुलगा मोशे प्रथमच भारतात येत आहे. तो येत्या 15 जानेवारीला देशात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भारत दौऱ्यासाठी तो खूप उत्साही आणि तेवढाच भावूक असल्याचे सांगतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असताना मोशेला आपल्या सोबत घेऊन येत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, जुलैमध्ये मोदींना इस्रायल दौरा केला त्यावेळी त्यांनी मोशेला भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले होते.
पालकांच्या वस्तू पाहण्यास आतुर मोशे
- मोशेचे आजोबा रब्बी शिमोन रॅझेनबर्ग यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "तो भारतात येण्यासाठी खूप उत्साही आणि तेवढा भावनिक आहे. 15 जानेवारीला तो भारतात जाण्याची तयारी करतोय. 
- आपल्या जन्मस्थळी जाण्याठी तो उत्सुक आहे. आतापर्यंत त्याने आपल्या आजींकडूनच आई-वडिलांबद्दल ऐकले आहे. आपल्या आई-वडिलांच्या जुन्या घरी जाऊन त्यांच्या वस्तू पाहण्याची तो आतुरतेने वाट पाहत आहे."
- मोशेचे वडील गॅब्रिएल होल्त्झबर्ग मुंबईच्या नरिमन हाऊसमध्ये संचालक होते. ते आपल्या पत्नी रिव्हका सोबत राहत होते. 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी त्यांच्यासह 6 जणांना ठार मारले होते. 
- या घटनेच्या वेळी मोशे फक्त 2 वर्षांचा होता. त्याच्या नॅनीने जिन्याखाली लपून त्याचा जीव वाचवला होता. 
- 2008 च्या त्या दहशतवादी हल्ल्यात 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसून 166 जणांचा जीव घेतला होता. त्यांनी मुंबईतील पाच ठिकाणांना लक्ष्य केले. त्यापैकी नरीमन हाऊस एक होते.

Post a Comment

 
Top