0
लग्नाला नकार दिल्याने हैदराबादेत 23 वर्षीय तरुणीची राहत्या घरात हत्या, असे पकडले आरोपीला
हैदराबाद/नवी दिल्ली - हैदराबादच्या मूसापेट परिसरात एका सेल्स प्रमोटर तरुणीची तिच्याच रूममध्ये हत्या करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपीचे नाव अनंत असून त्याने बी. जानकी नावाच्या या तरुणीपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तरुणीने नकार दिल्याने तो नाराज होता. जानकीची हत्या तिच्याच रूममध्ये करण्यात आली. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
रूममेटने दिली पोलिसांना माहिती...
- वृत्तसंस्थेनुसार, घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. तरुणी हैदराबादच्या मूसापेट परिसरात एका घरात किरायाने राहायची. तिच्यासोबत आणखी एक तरुणीही राहत होती.
- मीडिया रिपोर्ट्समध्ये मृत तरुणीचे नाव बोनू जानकी (23) सांगण्यात आले आहे. ती आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील राजमची राहणारी होती आणि काही महिन्यांपूर्वीच नोकरीच्या शोधात हैदराबादेत आली होती. जानकी येथे एका सुपरमार्केट चेनमध्ये सेल्स प्रमोटर पदावर कार्यरत होती. आरोपीही तिथेच काम करत होता.
- जानकीला रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला.
अनेक दिवसांपासून त्रास देत होता आरोपी
- जानकीच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, आरोपी अनंत अनेक दिवसांपासून जानकीला त्रास देत होता. तो अनेक वेळा तिच्या घरीही जात होता.
- सूत्रांनुसार, मंगळवारी रात्री जानकीची मैत्रीण घरी पोहोचली तेव्हा तिने जानकीला फरशी पडलेली पाहिले. तिच्या आजूबाजूला रक्त सांडलेले होते. तिने लगेच पोलिसांना कळवले. 
- तपास आणि जानकीच्या मैत्रिणीच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी अनंतला अटक केली. अधिक तपास सुरू आहे.
- पोलिसांच्या मते, जानकीच्या नातेवाइकांनीही अनंतबाबत माहिती दिली होती. सूत्रांनुसार, काही दिवसांपूर्वी त्याने जानकीला लग्न न केल्यास परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकीही दिली होती.

Post a Comment

 
Top