0


२०१३ साली संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड खटल्यात आज शिक्षा सुनावली जाणार आहे. सोमवारी नाशिक सेशन्स कोर्टानं ७ पैकी ६ आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर एका आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली होती.

सोनई तिहेरी हत्याकांड शिक्षेची सुनावणी आता 20 तारखेला
नाशिक, 18 जानेवारी : २०१३ साली संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड खटल्यात २० जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आरोपींना फाशीच दिली जावी, हा दुर्मिळातला दुर्मिळ खटला आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर मांडला आहे. दुपारी १२च्या सुमाराला निकम कोर्टात दाखल झाले होते. त्यानंतर सुनावणी सुरू झाली. गेल्या सोमवारी नाशिक सेशन्स कोर्टानं ७ पैकी ६ आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर एक आरोपी निर्दोष सुटला होता. २०१३च्या जानेवारी महिन्यात नेवासा फाटा इथं ३ तरुणांची निर्घुण हत्या करण्यात आली होती.
शिक्षेबाबत कोर्टात काय म्हणाले निकम ?
- या आरोपींना फक्त मृत्यूदंड दिला जावा. यासाठी मी 13 विशेष कारणं मांडली आहेत.
- हा दुर्मिळातला दुर्मिळ प्रकार आहे. आरोपींनी 3 दलित युवकांची निर्घृण हत्या केली. जशास तसा न्याय हवा.
- हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे. सवर्ण जातीतील युवतीचं दलित युवकावर प्रेम होतं. ते दोघंही लग्न करणार होते. हे मान्य नसल्यानं आरोपींनी कट रचून त्यांची हत्या केली.
काय आहे प्रकरण ?
- जानेवारी 2013मध्ये 3 तरुणांची हत्या
- उच्चवर्णीय मुलीवर प्रेम केलं म्हणून हत्या केल्याचा आरोप
- मृतांची नावं - संदीप धनवार, राहुल कंडारे, सचिन घारू
- तीनही मृत व्यक्ती त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते
- धनवार आणि कंडारेंचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले
- घारूंच्या मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेत टाकले
- विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती
- नेवासा सेशन्स कोर्टात खटला सुरू झाला
- नंतर खटला नाशिक सेशन्स कोर्टाकडे हस्तांतरित
- साक्षीदारांवर दबाव येऊ नये यासाठी खटला नाशिक कोर्टात
- एकूण 53 साक्षीदारांची साक्ष नोंदवली
सोनई तिहेरी हत्याकांडांतले आरोपी
- प्रकाश दरंदले - दोषी
- रमेश दरंदले - दोषी
- पोपट दरंदले - दोषी
- गणेश दरंदले - दोषी
- अशोक नवगिरे - दोषी
- संदीप कुऱ्हे - दोषी
- अशोक फलके - निर्दोष

Post a Comment

 
Top