0
बार डान्सरवर त्याने खर्च केले होते 2 कोटी रुपये; डोके फिरले अन् शिर केले धडापासून वेगळे
कामरेज/सुरत- एका तरुणाने बार डान्सर गर्लफ्रेंडची गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रीतेश याला गर्लफ्रेंडच्या दुसर्‍या अफेअरची माहिती मिळाली होती. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले होते.
- सूत्रांनूसार, पंजाबमधील भटिंडा येथील राहाणारी ज्योति उर्फ निशा भट्‌टी ही मुंबईतील बारमध्ये डान्सर होती.
- दोन वर्षांपूर्वी भीमराड रोड बारमध्ये कामरेजमधील टींबा गावातील रहिवाशी प्रीतेश पटेल याच्यासोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम जुळले. नंतर ती भटिंडा गेली होती.
- ज्योति तिने पार्टीमध्ये डान्स करत होती. 27 डिसेंबरला प्रीतेशचा वाढदिवस होता. यासाठी ज्योती ही ड्रायव्हर संदीप सिंग आणि त्याची पत्नी निकितासोबत टींबा येथे आली होती.
- नंतर चौघे मुंबईला गेले. चार दिवस हॉटेलमध्ये थांबले. या दरम्यान, ज्योति ही भटिंडा येथील गौरव नामक तरुणासोबत फोनवर सारखी बोलताना प्रीतेशच्या निदर्शनास आले. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
- 31 डिसेंबर सेलिब्रेट केल्यानंतर दुसर्‍या दिवशी 1 जानेवारीला सर्व मुंबईहून सुरत येथे आले. दुपारी एक वाजता टींबा येथे पोहोचले. प्रीतेश चौघांना घेऊन शेतात गेला. गाडी फिरवून येतो म्हणून संदीप सिंग आणि निकिताला खाली उतरवले. नंतर गाडीत प्रीतेश आणि ज्योति हे दोघे होते. गाडी शेतात नेऊन प्रीतेश याने ज्योतिची गळा कापून निर्घृण हत्या केली.
प्रीतेशने ज्योतिवर उडवले होते 2 कोटी रुपये....
- कामरेजचे पीआय के.व्ही. चुडास्मा यांनी सांगितले की, प्रीतेशने ज्योतिवर सुमारे दोन कोटी रुपये उडवले होते. परंतु ज्योतिचे दुसर्‍या तरुणासोबत अफेअर सुरु होते, याची प्रीतेशला भनक लागली होती. त्यामुळे तो प्रचंड संतापला होता.
- प्रीतेश विवाहीत होता. परंतु ज्योतिमुळे त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता.

Post a Comment

 
Top