0
मुंबई- पालघरमधील डहाणू येथे समुद्रात आज (शनिवार) बोट उलटली. बोटमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. त्यापैकी 32 विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळाले आहे. दोन विद्यार्थिनींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सहा विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. सर्व विद्यार्थी के. एल. पोंडा हायस्कूलचे असल्याची माहिती मिळाली आहे.
सूत्रांनुसार, पालघर जिल्ह्यातील के.एल. पोंडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल समुद्रावर गेली होती. 40 विद्यार्थ्यांना घेऊन डहाणूच्या समुद्रात एक बोट गेली. मात्र, अचानक बोट उलटून विद्यार्थी पाण्यात पडले. 2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे.
11 वी आणि 12 वीचे विद्यार्थी सहलीसाठी समुद्रात गेले होते. महेश अंबिरे हा बोटमालक स्वत: विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेला होता. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी बचावकार्य सुरु केले आहे. स्थानिक मच्छिमारांची बचावकार्यात मदत घेण्यात येत आहे.


Post a Comment

 
Top