0
कोरेगाव-भीमा हिंसाप्रकरणी 12 जणांना अटक; 3 जण अल्पवयीन, वढू बुद्रुकला 15 जण ताब्यात
पुणे-कोरेगाव-भीमा हिंसाप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव-भीमा, कोंढापुरी आणि सणसवाडीतून या सगळ्यांना अटक करण्यात आली. यापैकी 3 आरोपी हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. बाकीच्या 9 आरोपींना शिक्रापूर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोरेगाव-भीमाहून परतत असलेल्या दलित समाजातील लोकांवर सणसवाडी येथे हल्ला करण्यात आला होता. या जमावावर दगडांचा मारा करण्यात आला होता. त्यामुळे त्याचे महाराष्ट्रभर हिंसक पडसाद उमटले होते. दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदही पुकारण्यात आला होता. याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. अल्पवयीन वगळता बाकी सर्व जण 16 ते 17 या वयोगटातील आहेत. याप्रकरणातील 9 जणांना 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून तिघाजणांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. या आधी पोलिसांनी वढू बुद्रुक येथून 15 जणांना ताब्यात घेतले असून आतापर्यंत 27 जणांना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

 
Top