0
पुण्यात PMPच्या बसला भीषण आग; 10 दिवसांत तिसरी घटना, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बसला अचानक आग लागली. सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज (बुधवार) दुपारी पावणेदोनच्या सुमारास चिंचवडगाव बस स्थानकावर घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
चिंचवडगाव बसस्थानक आहे. बस (एमएच-12 एचबी 401) येऊन उभी राहिली. पावणेदोनच्या सुमारास या बसला अचानक आग लागली. ही आग एवढी भीषण होती की धुराचे लोट बाहेर येत आहेत. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संत तुकारामनगर येथील अग्निशामन दलातील बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अर्धा तास शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. बसला आग कशी लागली, याचे कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, पीएमपीएमपीएल बसला आग लागण्याची गेल्या दहा दिवसातील ही तिसरी घटना आहे. दिवेघाटात आणि सिंहगडरोड येथे पीएमपीएमएल बसला आग लागली होती.

Post a Comment

 
Top