![]() |
मुंबई- या वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर गाजवला तो गुजरात निवडणुकीने. याच निवडणुकीच्या धामधुमीत एक घटना थोडी झाकोळली ती म्हणजे फ्रान्सच्या मदतीने बनविलेली भारतीय बनावटीची आयएनएस कलवरी ही पाणबुडी नेव्हीच्या ताफ्यात दाखल झाली ती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ डिसेंबर २०१७ सकाळी दहा वाजता मुंबईत येऊन ती देशाला समर्पित केली. त्यानंतर ते आपल्या गृहराज्य गुजरातमध्ये विधानसभेसाठी मतदान करण्यासाठी गेले होते. माध्यमांनी नेमके तेच दाखविले व आयएनएस कलवरीची बातमी झाकोळली गेली. ..
काय महत्त्व आहे कलवरी पाणबुडीचे-
- ‘कलवरी’ म्हणजे टायगर शार्क. हिंदी महासागरात आढळणाऱ्या विक्राळ शार्कच्या नावावरुन कलवरी हे नाव देण्यात आले आहे.
- स्टेल्थ बांधणी आणि नेमके लक्ष्यभेद करणारी यंत्रणा ही कलवरीचे ठळक वैशिष्ट्ये आहे. - पाणतीर तसेच क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून पाण्यातून भूपृष्ठावर व पाण्यातून पाण्यात असे शत्रूवर दुहेरी हल्ले करण्याची क्षमता कलवरीकडे आहे. - या व्यतिरिक्त पाणसुरुंग पेरणे, पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करणे, त्याबरोबर शत्रूवर अस्त्रांचा अचूक छुपा पाणतीर हल्ला करणे इत्यादी लढाऊ सेवांचा सुद्धा या पाणबुडीत समावेश आहे. - कलवरी पाणबुडी १,५६५ टनाची आहे. तिची उंची १२.३ मी व लांबी ६७.५ मी आहे. पाणबुडीमध्ये ८ अधिकारी व ३५ खलाशी राहण्या-झोपण्याची सोय आहे. - कलवरीचा वेग पाण्याखालून २० नॉट (ताशी ३७ किमी); तर जमिनीवरून १२ नॉट (ताशी २२ किमी) राहील. - पाण्याचा कमी प्रतिकार व्हावा अशा पध्दतीने या पाणबुडीची विशिष्ट रचना करण्यात आली आहे. - पाणबुडीची युध्दसामग्री सज्जता अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि सेन्सर्सनीयुक्त असून त्यासाठी सबमेरीन टॅक्टीकल इंटीग्रेटेड कॉम्बॅक्ट सिस्टिमने सिध्द करण्यात आली आहे. - पाणबुडीच्या आक्रमण आणि शोध परिदर्शकासाठी लो लाईट लेव्हल कॅमेरा आणि लेसर रेंज फाईंडर्सचा उपयोग करण्यात आला आहे. - बॅटरी जलद गतीने चार्ज व्हाव्यात यासाठी 1,250 किलोवॅटची दोन डिझेल इंजिनेही या पाणबुडीवर आहेत.
आणखी सहा पाणबुड्या होताहेत तयार-
- भारताने कलवरीसारख्या एकून सहा अणुऊर्जायुक्त पाणबुड्यांचे उत्पादन ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत सुरू केले आहे.
- कलवरी पाणबुडीनंतर आणखीन पाच स्कॉर्पिन पाणबुड्या माझगाव डॉकमध्ये फ्रान्सच्या साहाय्याने तयार होत आहेत. - हे प्रकल्प- ७५ चे काम ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत सुरू आहे व एकूण खर्च रु. २३,६५३ कोटी होणार आहे. - दुसरी ‘आयएनएस खंदेरी’ पाणबुडी २०१८ सालाच्या मध्यात, तिसरी ‘करंज’ २०१९ मध्ये व बाकीच्या पाणबुड्या २०२०-२०२१ मध्ये तयार होणार आहेत. - भारतीय नौदलातील पूर्वीची कमतरता नष्ट करून नौदल लवकरच अधिक शक्तिशाली होत आहे. - गेल्या १७ वर्षांत भारतीय नौदलात एकही पाणबुडी दाखल झाली नव्हती. सेवेत असलेल्या काही पाणबुड्या निवृत्त, तर काही जुन्या होऊन जर्जर झाल्या आहेत. - त्यामुळे या पाणबुड्यांचे महत्त्व कित्येक पटीने आहे. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment