0
नवी दिल्ली-हिमाचल प्रदेश व गुजरातमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर या राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा रंगली आहे. गुजरातमध्ये मावळते मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे नाव आघाडीवर मानले जाते. मात्र, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे नावही स्पर्धेत आहे. हिमाचल प्रदेशात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले जयराम ठाकूर यांचेही नाव चर्चेत आहे. गुजरातमध्ये रुपाणी यांचे नाव आघाडीवर असले तरी उत्तर प्रदेशप्रमाणे नवा चेहराही दिला जाण्याची शक्यता आहे. यात स्मृती इराणी व पाटीदार समाजाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या नावाचीही चर्चा आहे.
यामुळे स्‍मृती इराणी यांचे नाव पुढे
- उत्‍तर प्रदेशप्रमाणे गुजरातमध्‍येही भाजप नवा चेहरा देऊ शकतो. संघटन क्षमता आणि गुजराती भाषा येत असल्‍यामुळे स्‍मृती इराणी यांचे नाव पुढे आहे.
- पाटीदार समाजातून आलेले केंद्रीय मंत्री मनसूख मां‍डविया यांचेही नाव गुजरातच्‍या मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीत पुढे आहे.
- मात्र आतापर्यंतच्‍या भाजपच्‍या निवडीवर लक्ष दिल्‍यास ज्‍यांचे नाव चर्चेत असते त्‍यांची निवड केली जात नाही, असा ट्रेंड आहे.
हिमाचल प्रदेशमध्‍ये धूमल यांच्‍या पराभवामुळे भाजपसमोर अडचणी
- हिमाचल प्रदेशमध्‍ये भाजपचे मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धूमल यांचा पराभव झाल्‍याने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि 5 वेळेस विधानसभेवर निवडून गेलेले जयराम ठाकूर हे मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीत सर्वात पुढे आहे.
- असे असले तरी, 7व्‍यांदा निवडून आलेले मोहिंदर सिंह, 5 वेळेस निवडणूक जिंकणारे राजीव बिंदल, हिमाचलचे माजी भाजप अध्‍यक्ष सुरेश भारद्वाज आणि चौथ्‍या वेळेस विधानसभेवर जाणारे कृष्‍ण कपूर यांचेही नावे चर्चेत आहेत.

Post a Comment

 
Top