0
विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब; शरद पवार वाढदिवशी रस्त्यावर उतरणार
नागपूर-विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधकांनी काढलेला हल्लाबोल मोर्चा आज (मंगळवार) विधानभवनावर धडकणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुलाम नबी आझाद करणार आहे. शरद पवार यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. ते वाढदिवशी भाजप सरकारच्या रस्त्यावर उतरणार आहेत. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसह, काँग्रेस, शेकाप, सपाचे सहभागी होणार आहेत.
दुसरीकडे, विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून खाली या, अशी विरोधकांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधक वेलमध्ये येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी आणि सामान्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे.
राजकारणात पन्नाशी पूर्ण केलेल्या शरद पवार यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. या राजकीय प्रवासात त्यांनी महाराष्ट्रासह केंद्रात अनेक महत्त्वाची पदे भूषणली आहेत. पवारांनी तब्बल 30 वर्षांनी सरकाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. याआधी 1985 मध्ये त्यांनी तत्कालीन राज्य सरकारविरोधात सायकल मोर्चा काढला होता. जळगावातून सुरु झालेला हा सायकल मोर्चा नागपुरात संपला होता.

Post a Comment

 
Top