0

इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झा क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होणार नाही. 'विरुष्का'च्या लग्नावर बोलताना, हायप्रोफाइल लोकांच्या लग्नाच्या वेळी नेहमीच अशा प्रकारच्या अडचणी येतात. कारण, त्यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग असते.


  सानिया मिर्झा 21 डिसेंबर रोजी देशाबाहेर जात आहे. तिने सांगितल्याप्रमाणे, 'कदाचित त्यावेळी मी भारतात नसेल. दुबईत असेल, निश्चित काही सांगता येत नाही
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचे दोन रिसेप्शन होणार आहेत. पहिले रिसेप्शन 21 डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडणार आहे. यात नातेवाइक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींना बोलावण्यात आले आहे. तर दुसरे रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी आहे. त्यामध्ये क्रिकेट आणि चित्रपट जगतातील सेलिब्रिटीज सहभागी होणार आहेत.

Post a Comment

 
Top