
कोल्हापूर- सोवळं न नेसल्याने श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना आज (शुक्रवार) करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना सोवळं नेसणे अनिवार्य आहे, मात्र पाटणकर यांनी सोवळं न नेसल्याने पुरोहीतांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. ही माहिती खुद्द पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यांनी यावेळी दिला.
सूत्रांनुसार, भारत पाटणकर हे आपल्या काही निवडक कार्यकर्त्यांसह अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आले होते. गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात जावून रितसर परवानगीही घेतली होती. मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यात जाताना त्यांना पुरोहितांनी अडवले. सोवळं नेसून गाभाऱ्यात प्रवेश करण्याची परंपरा आहे. तुम्हाला तसे जाता येणार नाही, असे सांगितले.
यावर पाटणकर यांनी, 'संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरांमध्ये देवाचा चरणस्पर्श करता येतो. येथेच का दिला जात नाही. सोवळं नेसणे याचा अर्थ शुद्ध असणे, असाच असेल, तर आम्ही शुद्ध आहोत. आम्हाला प्रवेश करू द्या.' अशी मागणी केली. तरीही मंदिरातील पुरोहीतांनीळ त्यांना देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला नाही.
राज्य सरकारने सुरू हिवाळी अधिवेशनात अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांना हटविण्याबाबत निर्णय घेतला नाही, तर आम्ही विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशाराही पाटणकरांनी पत्रकारांसोबत बोलताना दिला आहे.
Post a Comment