नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी पहिल्यांदा गुजरातेत पोहोचले. ते सर्वात आधी सोमनाथ मंदिरात गेले. येथे त्यांनी पूजा केली. ते गुजरातमध्ये निवडून आलेले काँग्रेसचे 77 आमदार आणि पक्षनेत्यांसह समीक्षा बैठकही करणार आहेत. यापूर्वी ते निवडणूक प्रचारादरम्यान गुजरातेतील 27 मंदिरांत गेले होते. सोमनाथमध्ये त्यांचे गैरहिंदू रजिस्टरवर नाव दाखल झाल्याने वाद उभा राहिला होता. तथापि, 99 जागा जिंकल्यानंतर भाजप 6व्यांदा गुजरातेत सरकार स्थापन करणार आहे. विजय रूपाणी मुख्यमंत्री आणि नितीन पटेल उपमुख्यमंत्री होतील.
राहुल यांचे ट्विट- #BJPLieHard पार्टी
- गुजरात दौऱ्याआधी राहुल गांधींनी ट्विट करून भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी लिहिले- ''जर भाजपकडे एखादी फिल्म फ्रँचायझी असती तर याला लाय हार्ड म्हटले गेले असते. #BJPLieHard #BJPLies #HowManyBJPLies''
CWC मीटिंगनंतर म्हणाले- राफेल डीलवर मोदी गप्प का आहेत?
- राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष बनल्यानंतर शुक्रवारी काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) ची पहिली मीटिंग झाली. येथे पक्ष मुख्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले.
- राहुल यांनी भाजपवर हल्ला चढवत म्हटले की, ''आम्ही पंतप्रधानांना तीन प्रश्न विचारले होते. कोणतेही उत्तर दिले नाही. जय शहा आणि राफेल डीलवर पीएम का बोलत नाहीत? नोटबंदी आणि गब्बर सिंग टॅक्सवर का बोलत नाहीत?''
- ''आज 2G प्रकरणाचे सत्य सर्वांसमोर आले आहे. जर तुम्ही गुजरातचे मोदी मॉडेल पाहिले तर हे पूर्ण खोटेच आहे. आम्ही जेव्हा गुजरातला गेलो तेव्हा लोकांनी म्हटले की, तेथे कोणतेही मॉडेल नाहीये. लोकांनी आम्हाला असेही सांगितले की, तेथे फक्त लोकांचे हक्क हिसकावले जात आहे.''
- ''15 लाख रुपये प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये देण्याचे वचन मोदी सरकारने दिले होते. काय झाले? ते फक्त खोटेच बोलतात, हेच सत्य आहे.''
![]() |
Add caption |
Post a Comment