![]() |
चेन्नई-चक्रीवादळ आेखीचा तडाखा बसल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक गुरुवारी चेन्नई व कन्याकुमारीला दाखल झाले. त्यांनी नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली.
चेन्नईसह परिसरातील काही शहरांनादेखील या चमूने भेट दिली. मासेमारी करणाऱ्या अाणि वादळाचा तडाखा बसलेल्या पीडितांनी आपली व्यथा या पथकासमोर मांडली. अद्यापही अनेक मासेमार वादळात बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध लागू शकलेला नाही. त्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची विनंती मासेमारांनी केली. वादळाचा तडाखा बसलेल्या चेन्नई, कांचिपुरम, तिरुवल्लूर भागातील पाहणी शुक्रवारपर्यंत चालणार आहे, असे महसूल विभागाचे सचिव बी. चंद्रमोहन यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. रस्ते, पायाभूत सुविधा, प्राणहानी इत्यादी पातळीवर प्रदेशाच्या एकूण नुकसानीचा तपशील संकलित करून नंतर हा अहवाला केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. संजीव कुमार जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील हे पथक आहे. शुक्रवारी हे अधिकारी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांची भेट घेतील. कन्याकुमारीत पुनर्वसन : राज्य सरकारने कन्याकुमारी येथे कायमस्वरूपी पुनर्वसन कार्यक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी केंद्राकडे ५ हजार २५५ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. त्याशिवाय ४ हजार ४७ कोटी रुपयांची उभारणी केली जाईल, असे राज्य सरकारच्या सूत्रांनी सांगितले. ९ हजार ३०० कोटी रुपयांच्या मदतीची पंतप्रधानांकडे मागणी आेखी चक्रीवादळातील नुकसान आणि प्राणहानीचा विचार करून केंद्राने राज्याला किमान ९ हजार ३०० कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे केली होती. केंद्र सरकारने हानीची व्याप्ती पाहून त्यास राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची विनंतीही करण्यात आली होती. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment