![]() |
लातूर- जिल्ह्यातील चांदगाव येथील एका युवकाने आपल्या वडिलांना जीवंत जाळले. त्याला विरोध करणाऱ्या त्याच्या आईवर त्याने कुऱ्हाडीने वार केले. गंभीररित्या जखमी झालेल्या आरोपीच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यसनाधीन असलेल्या या मुलाने जमिनीसाठी हे कृत्य केले. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण
- उदगीर तालुक्यातील चांदगाव येथे केरबा वंगवाड नावाचा शेतकरी आपल्या पत्नी आणि मुलीसह राहत होता. त्याच्याकडे 35 एकर शेती आहे.
- या शेतकऱ्याचा मुलगा गोविंद याला दारुचे व्यसन होते. तो आपल्या वडिलांकडे सतत जमिनीचा हिस्सा मागत होता.
- घरच्या त्याच्या व्यसनाधीनतेमुळे वैतागले होते व त्याच्या नावावर जमीन करत नव्हते. सोमवारी वेळ अमावस्येची पुजा केल्यानंतर ते शेतात जेवत होते.
- त्याचवेळी गोविंद तेथे आला. तो जमिनीसाठी वाद घालू लागला व तेथे असणाऱ्या कुऱ्हाडीने त्याने वडिलांच्या डोक्यात वार केले.
- या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या केरबा यांना त्याने जवळच पुजेसाठी बनविलेल्या झोपडीत ढकलले आणि या झोपडीला आग लावली. या आगीत सापडलेल्या केरबा यांचा मृत्यू झाला.
- त्यानंतर आरोपीने आपला मोर्चा त्याच्या आईकडे वळवला. वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या आईवर त्याने कुऱ्हाडीने वार केला. त्यांचा नोकर संग्राम याने तिथे धाव घेत त्यांचा जीव वाचवला.
|
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment