0
विराटपूर्वी या तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती अनुष्का, दोन वर्षे होते अफेअर
मुंबईः अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 डिसेंबर रोजी क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत विवाहबंधनात अडकली. इटलीत या दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केले. मागील चार वर्षांपासून अनुष्का विराटसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2013 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगच्या निमित्ताने दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि आता लग्नात झाले आहे. पण विराटपूर्वी अनुष्काच्या आयुष्यात एका तरुणाची एन्ट्री झाली होती.
चित्रपटसृष्टीतील पदार्पणापूर्वी अनुष्काची या तरुणासोबत भेट झाली होती. या तरुणाचे नाव आहे. जोहेब यूसुफ. मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असताना अनुष्का आणि जोहेब बंगळूरुमध्ये भेटले होते. येथेच दोघांचे सूत जुळले. नंतर हे दोघे नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. दोन वर्षे या दोघांचे अफेअर सुरु होते. 2008 मध्ये अनुष्काला 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटाची ऑफर आली आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीत मिळत गेलेल्या यशानंतर अनुष्काने मागे वळून पाहिले नाही. तिने जोहेबला खूप मागे सोडून दिले.

या अभिनेत्यांसोबतही जुळले अनुष्काचे नाव...
- जोहेब यूसुफव्यतिरिक्त अनुष्काचे नाव काही बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटसोबतही जुळले. यामध्ये रणवीर सिंह, शाहिद कपूर, क्रिकेटर सुरेश रैना, रणबीर कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या नावांचा समावेश आहे. पण जोहेब यूसुफला वगळता इतरांसोबतच्या अनुष्काच्या अफेअरच्या बातम्या केवळ गॉसिप ठरल्या.

Post a Comment

 
Top