0
नाशिक, जळगावहून मुंबईचे ‘उडान’ दुसऱ्या दिवशीच थांबले; प्रवाशांची घोर निराशा
जळगाव / नाशिक- शनिवारी वाजत-गाजत उत्साही वातावरणात नाशिक व जळगाव शहरातील मुंबईसाठी सुुरू झालेली विमानसेवा दुसऱ्या दिवशी रविवारीच खंडित झाली. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाला. नाशिकहून रविवारी फक्त पुण्यासाठीच विमान रवाना झाले. या विमानाची सर्व तिकिटे बुक झाली हाेती.

जळगाव व नाशिक शहरातून शनिवारी ‘उडान’ याेजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील विमान सेवेला सुरुवात करण्यात अाली. पहिल्याच दिवशी मुंबई विमानतळावर स्लाॅट न मिळाल्याने जळगावातील उद‌्घाटनाचे विमान तीन तास उशिराने उडाले हाेते. राज्यात नाशिक, काेल्हापूर व जळगाव या तीन ठिकाणाहून उडान सेवेचा दुसरा टप्पा सुरू हाेणार हाेता. त्यामुळे पहिल्या दिवशी उशीर झाल्याचे कारण त्यासाठी देण्यात अाले. मात्र, रविवारी एअर डेक्कनच्या वरिष्ठ कार्यालयातर्फे जळगावच्या व्यवस्थापनाला विमान रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांची निराशा झाली. मात्र विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत ठाेस कारण देता अाले नाही.

मुंबई विमानतळावर काही अडचणी येत असल्याने नाशिकहून ‘उडान’ याेजनेंतर्गत मिळालेल्या मार्गावर सेवा देण्यात विलंब लागत असल्याचे एअर डेक्कनचे चेअरमन कॅप्टन गाेपीनाथ यांनी शनिवारी सांगितले हाेते. मात्र, नाशकातून उड्डाणाकरिता अावश्यक सर्व परवानग्यांची पूर्तता झाल्याने रविवारपासून नियमित सेवा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले हाेते. मात्र रविवारी दुसऱ्याच दिवशीच नाशिककरांना मुंबईकरिता विमान सेवा उपलब्ध हाेऊ शकलेली नाही.

Post a Comment

 
Top