0
सलमान, शाहरुखसह विराट कोहली ठरला सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी, फोर्ब्सची श्रीमंतांची यादी जाहीर
नई दिल्ली: फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत यंदाही अभिनेता सलमान खानने पहिले स्थान कायम राखले आहे. 51 वर्षीय सलमान खान वार्षिक 232.83 कोटी रुपयांसह सेलिब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. यावर्षी रिलीज झालेल्या ट्युबलाइट या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरीदेखील सलमानने हे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलिब्रिटी हे यंदाही कायम आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवलं आहे. शाहरुख 170.50 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.

विराट कोहली तिस-या स्थानावर...
सलमान आणि शाहरुखनंतर सर्वाधिक कमाई करणा-या भारतीयांच्या यादीत प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाहबद्ध झालेला विराट कोहलीचे नाव आहे. सेलिब्रिटी श्रीमंतांच्या या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या वर्षाही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कोहलीची वार्षिक कमाई 100.72 कोटी रुपये नोंदली गेली आहे

Post a Comment

 
Top