0
चैत्यभूमीवर जनसागर लोटला, डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला महिनाभरात सुरुवात- मुख्यमंत्री

मुंबई- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे दादर परिसर भीमसैनिकांनी गजबजून गेला आहे.
डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाचे टेंडर निघाले- मुख्यमंत्री
61 व्या महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरुवात होईल, या कामाचे टेंडर निघाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
'दादर टर्मिनसचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस'
दादर टर्मिनसचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस झालेच पाहिजे, असे म्हणत भीम आर्मीने दादर टर्मिनसचे नामांतर केले. स्टेशन परिसरात पोस्टर्सही लावण्यात आले आहे.
महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दादरचा समुद्रकिनारा पोलिसांनी वेढलेले आहेत. तसेच किनाऱ्यावर फेन्सिंगही टाकण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top